Épisodes

  • # 1892: मोल नेहमीच पैशात नसतं...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 7 2025

    Send us a text

    फळवाल्या म्हातारीला कृष्ण म्हणतो, "ती सगळीच फळं मला दे. "
    म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."
    कृष्ण निरागसपणे विचारतो, "मोल म्हणजे काय ?"
    त्यावर ती समजावून सांगते, "लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात."
    कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मागत नाही? गोपी सुद्धा मला दही दूध लोणी देतात माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्या माझ्याकडून काही घेत नाहीत. "

    Afficher plus Afficher moins
    9 min
  • # 1891: "Nature doesn’t punish, it balances." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 5 2025

    Send us a text

    काय अद्भुत होतं ते दृश्य!

    विजयी अल्फा नरने दुसऱ्याच्या मानेवर फक्त हलके दात टेकवले. चावा नाही, रक्तपात नाही . त्या क्षणी सत्तेचा प्रश्न सुटला होता.

    पराभूतात भेकडपणा नव्हता, विजेत्यात दया नव्हती — फक्त एक नाजूक समतोल होता.
    दोघांनीही एकमेकांकडे पाठ फिरवली.

    टोळी पुन्हा शांत झाली.


    Afficher plus Afficher moins
    7 min
  • # 1890: Ten days in a mad-house. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 4 2025

    Send us a text

    ‘पिट्सबर्ग डिसपॅच’ या स्थानिक वृत्तपत्रात‘मुली कसल्या कामाच्या?’ अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक खरमरीत प्रतिक्रिया लिहून पाठवून दिली. ती संपादकांना आवडली. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात तिला एक छोटा स्तंभलिहिण्याची संधी दिली. त्याकाळी स्त्रिया सहसा टोपणनावाने लेखन करीत. वृत्तपत्राच्या संपादकाने 'नेल्ली ब्लाय' हेच नाव टोपणनाव म्हणून दिले.

    Afficher plus Afficher moins
    12 min
  • # 1889: उत्सवाचं रसायन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 3 2025

    Send us a text

    अगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्राची होती. ते मेंदूच्या बुडाशी असलेलं बदामाच्या आकाराचं केंद्र (Amygdala) सतत धोक्याची घंटा वाजवत राही. मेंदूच्या इतर सगळ्या कर्त्याकरवत्या केंद्रांचं लक्ष नेहमी त्या बदामकेंद्रावरच खिळून असे.

    Afficher plus Afficher moins
    7 min
  • # 1888: बेला आणि कल्याणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 2 2025

    Send us a text

    जेव्हा मोहम्मद घोरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला, तेव्हा "गजनीचे सर्वोच्च काझी व मोहम्मद घोरीचे गुरु निजामुल्क" यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले –
    "या घोरी या! आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्थानवर विजय मिळवून इस्लामचे नाव उजळवलेस. सांग, त्या ‘सोने की चिड़ीया’ हिंदुस्थानचे किती पंख कापून आणलेस?"

    Afficher plus Afficher moins
    7 min
  • # 1887: "चालवीसी हाती धरूनिया" लेखिका : सावनी गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 1 2025

    Send us a text

    आपल्या हाताला धरून चालायला शिकलेली आपली मुलं जेव्हा मोठी होतात... शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आचार-विचार-अनुभवांची कक्षा रुंदावत जाते. त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीचा सामना करण्यातून ती परिपक्व होत जातात... आणि मग अशी वेळ येते जेव्हा त्यांच्या हाताला धरून आपली वाटचाल सुरू होते...

    Afficher plus Afficher moins
    12 min
  • # 1886: आता मला काही फरक पडत नाही. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Oct 31 2025

    Send us a text

    रमेशजींचं वय आता ६५ वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरकोळ कारणांवर नाराज होणं, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता.
    घरच्यांना खूप त्रास व्हायचा. पत्नी विचारायची, “काय झालंय रमेशजींना? आधी इतके आनंदी असायचे, आता जरा जरी काही झालं तरी संतापतात.” मुलंही आता त्यांच्याशी बोलायला घाबरू लागली होती. रमेशजींनाही जाणवू लागलं होतं की ते स्वतः बदलले आहेत. त्यांनाही स्वतःवर राग यायचा — “मी असं का वागतोय? हा चिडचिडेपणा माझ्यात आला कुठून?”

    Afficher plus Afficher moins
    7 min
  • # 1885: भुलभुलैय्या... भुलेचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Oct 30 2025

    Send us a text

    'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. तरीपण त्याला याची जाणीवच झाली नाही, हे तिथं उपस्थित असलेल्या होरॅस वेल्स या डेंटिस्टनं पाहिलं. दात काढताना त्याचे पेशंट मोठ्यामोठ्याने ओरडल्याने बाहेर बसलेले पेशंट देखील घाबरून पळून जात असत म्हणून तो त्रस्त होता. मग त्याने विचार केला, उद्या आपण याचा प्रयोग करून बघू.. आणि हा प्रयोग त्याने स्वतःवरच लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचा दात काढून घेऊन केला. त्याला अजिबात दुखले नाही. तो यशस्वी झाला.

    Afficher plus Afficher moins
    11 min