Couverture de Viveki Katta

Viveki Katta

Viveki Katta

De : Amit Karkare
Écouter gratuitement

À propos de ce contenu audio

एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवणारे, तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे, एकमेकांच्या अनुभवातून चार गोष्टी शिकवणारे, थोडक्यात रोजच्या जगण्याला विवेकाची फोडणी देणारे विचार. अजूनही बरंच काही होऊ शकेल… जसंजसं सुचेल तसतसं गोळा करु या कट्ट्यावर… शेवटी हेतु एकच आहे… आपले रोजचे जगणे साधे सोपे करणे.Amit Karkare Hygiène et vie saine Psychologie Psychologie et psychiatrie
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • पॉडकास्ट कुणी ऐकतं का?
      Feb 12 2026

      आपण बोलतोय… पण खरंच कुणी ऐकतंय का?
      पॉडकास्ट सुरू करताना प्रत्येकाच्या मनात येणारा हा प्रामाणिक आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न.

      या भागात आपण पॉडकास्टच्या अदृश्य श्रोत्यांबद्दल बोलतो —
      संख्या कमी असली तरी लक्ष देऊन ऐकणाऱ्या लोकांबद्दल.
      रील्सच्या गोंगाटात आणि लाईक्सच्या जगात, शांतपणे निवडून ऐकणाऱ्या श्रोत्यांची किंमत काय असते?

      थोडा विनोद, थोडं आत्मपरीक्षण…
      आणि एक साधा पण महत्त्वाचा विचार —
      “आपण बोलतोय ते खरंच कुणासाठी?” 🎙️

      Afficher plus Afficher moins
      3 min
    • कामासाठी एआयचा वापर करावा का?
      Jan 26 2026

      एआय सध्या सर्वत्र आहे — कंटेंट क्रिएशन, व्हॉईसओव्हर, इमेजेस, म्युझिक, अगदी चित्रपट निर्मितीपर्यंत. पण प्रश्न असा आहे की एआय वापरणं योग्य आहे का? तो आपल्या कामाला मदत करतो की सर्जनशीलतेला मारक ठरतो?

      या भागात आपण एआयकडे एक टूल म्हणून पाहतो — ब्रशसारखं, कॅमेरासारखं, सर्जरीच्या उपकरणांसारखं. कलाकार महत्वाचा की साधन? गुणवत्ता आणि संवंगगिरी यामधला फरक काय? आणि भविष्यात खरा कलाकार कुठे उभा राहील?

      विवेकाने विचार करूया —
      एआय आपला नोकर असावा की मालक?

      ऐका, विचार करा आणि तुमचं मत जरूर कळवा. 🎧

      Afficher plus Afficher moins
      5 min
    • आकाशवाणी - 'हॅलो डॉक्टर' - पुष्पौषधींचे फायदे
      Jan 3 2026

      'पुष्पौषधीचे फायदे' या विषयी पुष्पौषधी आणि होमीओपॅथी तज्ञ डॉ. अमित करकरे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे आणि माहिती.

      सूत्रसंचालन, निर्मिती सहाय्य - आरती पटवर्धन

      सादरकर्ते - विक्रांत मंडपे

      प्रथम प्रसारण - शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून

      Afficher plus Afficher moins
      28 min
    Aucun commentaire pour le moment