Épisodes

  • RAJ'KARAN PODCAST : महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया : चूल आणि मूल वाक्याला पहिल्यांदा तडा दिला तो 'महाराष्ट्रानेच'!
    Mar 6 2026
    इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार ज्याने कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदा सणसणीत चपराक दिली. राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांच्या सहभागाची प्रक्रिया आता नॉर्मलाईज झालीय. पण या प्रक्रियेच्या मुळाशी महाराष्ट्र आहे हे अभिमानाने सांगायला हवं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, International Women's Day, Women’s Reservation, women’s politics
    Afficher plus Afficher moins
    15 min
  • RAJ'KARAN PODCAST : भाजपच साम्राज्य मजबूत करणारा ‘माधव’ पॅटर्न : मुंडेंनी वाढवलेल्या झाडाची फळे फडणवीस चाखतायत!
    Feb 27 2026
    'माधव पॅटर्नमुळे' महाराष्ट्रात भाजपचे सध्या सर्वार्थाने 'अच्छे दिन' सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 अन् 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाले आहे. भाजपच्या आजच्या या यशामागे दिवंगत वसंतराव भागवत आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या 'माधव पॅटर्न'चा वाटा मोठा आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Gopinath Munde, Devendra Fadnavis, Rss, Narendra Modi, Amit Shaha
    Afficher plus Afficher moins
    9 min
  • RAJ'KARAN PODCAST : एका विरोध झाला अन् मुन्ना महाडिक, बंटी पाटील मैत्रीचा कायमचा कंडका पडला! कोणालाही माहिती नसलेली स्टोरी
    Feb 20 2026
    बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक... महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान. दोघेही एकेकाळी जिवलग मित्र होते, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या मारताना चर्चिले जायचे. मग एवढ्या जीवघेण्या संघर्षापर्यंत हे दोन मित्र कसे आले? नेमका कुठे खडा पडला? पाहुया आजच्या राजकारण पॉडकास्टमध्ये... KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Satej Patil, Dhananjay Mahadik, NCP, Shivsena, BJP, Kolhapur Politics
    Afficher plus Afficher moins
    12 min
  • RAJ'KARAN PODCAST : राजीव गांधींच्या एका वाक्यावर शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला...
    Feb 13 2026
    केंद्रात काँग्रेसची ताकद वाढत होती. विरोधी पक्षात बसून राजकारण करण्यापेक्षा सत्तेत यावं असे राजीव गांधी यांचे मत होते. खासदार असताना शरद पवार यांचा राजीव गांधी यांच्यासोबत संवाद व्हायचा. त्यावेळी त्यांनी बोललेल्या एका वाक्यानंतर शरद पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, congress, Sharad Pawar, Rajiv Gandhi
    Afficher plus Afficher moins
    13 min
  • RAJ'KARAN PODCAST : कधी पक्षाविरोधात जाऊन, कधी कोंडून ठेवून तर कधी शरद पवारांचा विरोध डावलून अजितदादांनी नेते तयार केले...
    Feb 6 2026
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. पण नेते घडवणारे 'विद्यापीठ' म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकेच खरे आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ajit Pawar, NCP, Pune
    Afficher plus Afficher moins
    12 min
  • RAJ'KARAN PODCAST : रामराजे नाईक निंबाळकरांचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व संपवणार संघर्ष...
    Jan 30 2026
    फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. सुरुवातीला एकत्र काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वाद दुसऱ्या पिढीत पोचला आहे. दुसऱ्या पिढीत मात्र तो वाद वैयक्तिक पातळीवर येऊन पोचला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Phaltan Politics, Ramraje Naik Nimbalkar, Ranjeetsinha naik Nimbalkar, NCP, BJP, Congress
    Afficher plus Afficher moins
    14 min
  • RAJ'KARAN PODCAST : 'पायलट' नातवाने 'मुख्यमंत्री' आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं...
    Jan 23 2026
    माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपिट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण राज्याने बघितली. सत्तेच्या वारशाच्या वादाने, विचारांच्या लढायांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा 2 राजकीय भागात विभागला गेला.
    Afficher plus Afficher moins
    17 min
  • RAJ'KARAN PODCAST : विलासरावांनी निलंगेकरांविरोधात पुकारलेलं बंड राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता...
    Jan 16 2026
    शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांमधील हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नव्हता, तर जिल्ह्याची नाडी कोणाच्या हातात राहणार आणि राज्याच्या सिंहासनावर कोणाचे वर्चस्व असणार, याचा ऐतिहासिक लढा होता. एकेकाळी मार्गदर्शक असलेल्या निलंगेकरांच्या विरोधात विलासरावांनी पुकारलेले हे बंड म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Latur Politics, Vilasrao Deshmukh, Shivaji Patil Nilangekar, Congress
    Afficher plus Afficher moins
    8 min